mansoon update: अजून राज्यात किती दिवस उन्हाचा चटका.

Monsoon update

mansoon update: अजून राज्यात किती दिवस उन्हाचा चटका.

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 1 मे पासून हवामान कोरडे राहील असा संदेश दिला होता. आणि 1 मे पासून आपल्याला सगळीकडे हवामान कोरडे बघायला मिळत आहे. मात्र १ मे पासून राज्यात उन्हाचा अधिक प्रभाव जास्त होत आहे. आणि या उन्हाच्या चटक्यामुळे शेतकरी आता हैराण झालेले आहे. शेतकऱ्यांना मात्र आता पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.

तरी आता राज्यात किती तारखेपासून हवामानात बदल बघायला मिळेल हे आपण जाणून घेऊया. 7 ते 11 मे या दरम्यान पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह तसेच विजेच्या कडकडासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, आणि तसेच काही भागात गारपीटीची सुद्धा शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी 6 मे पर्यंत आपण आपल्या शेती पिकाचे कामे करून घ्यावे. असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे सांगतात. mansoon update in 2024

तरी यंदा राज्यात पावसाच आगमन कधी होईल..? तरी यंदा १२ ते १३ जून पासून मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होईल, मात्र हा पाऊस पेरणी योग्य नसणार आहे. शेतकऱ्यांची पेरणी मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यात वर्तवण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बातमी म्हणजे 22 जून नंतर पेरणी योग्य पावसाला सुरुवात होईल. अचानक हवामानात बदल झाला तर लवकर संदेश दिला जाईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे. Panjabrao dakh

YouTube विडिओ पहा

mansoon update : यंदा महाराष्ट्रात मान्सूनच आगमन कधी होणार..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *