राज्यात 27 ते 29 जून दरम्यान या भागात जोरदार पाऊस..
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी राज्यात 27 ते 29 जून दरम्यान काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 28/29/30 जून दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, जळगाव, संभाजीनगर, कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र, या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. त्यांनी दिलेला संपूर्ण अंदाज आपण या लेखातून जाणून घेऊया.
पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार राज्यात वर्धा, नागपूर, भंडारा-गोंदिया,अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, परभणी, जळगाव, जालना, बीड, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, या भागात 28 ते 30 जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे. अशी माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
राज्यातील उर्वरित भागात सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागात पाऊस जोरदार पडेल तर काही भागात मध्यम स्वरूपाचा ही पडेल. अशी माहिती पंजाब डख यांनी दिली आहे. Mansoon breaking news टुडे
पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज तुम्ही youtube द्वारे खाली पाहू शकता. 👇🏻