कापूस खत व्यवस्थापन पहिला डोज कोणतं खत,किती टाकायचं पूर्ण माहिती..
नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदाच्या हंगामामध्ये आता मान्सून ने काही भागात जोरदार हजेरी लावलेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी ही झालेल्या आहे. आणि कपाशी उगवून दहा ते पंधरा दिवस पूर्ण झालेले आहे. आणि ज्यांचा अजून खताचा पहिला डोज बाकी आहे. अशा शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत माहिती पहावी.
शेतकऱ्यांनो कपाशीला खत कोणतं टाकायचं किंवा किती द्यायचं, कोणत्या खतासोबत मिक्स करायचं. हे माहिती असणं महत्त्वाचं आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवडी सोबतच खताचा पहिला डोस दिलेला आहे. आणि काही शेतकऱ्यांचा अजून बाकी आहे. दहा ते पंधरा दिवसाची कपाशी झाली कीच खताचा पहिला डोज देणे महत्त्वाचे असते.
कपाशीला योग्य आकारात, चांगल्या पद्धतीने तुम्ही खत टाकू शकता. तसेच तुम्ही अनुभवलेले ही खते तुम्ही पहिल्या डोजासाठी टाकू शकता. कपाशीला चांगल्या खताचे व्यवस्थापन तुम्ही स्व:ता सुद्धा करू शकता. कपाशीला खत टाकणे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे जेणेकरून फुटवे वाढतील, हिरवेपणा येईल.
🔶 Dap – ( 50 kg ) + पोट्याश ( 30-35 kg) + मॅग्नेशियम सल्फेट ( 10 kg )
🔷 12:32:16 – ( 50 kg ) + मॅग्नेशियम सल्फेट ( 10 kg )
🔶 10:26:26 – ( 50 kg ) + मॅग्नेशियम सल्फेट ( 10 kg )
🔷 20:20:00:13 – ( 50 kg ) + पोट्याश ( 30-35 kg ) + मॅग्नेशियम सल्फेट ( 10 kg )
या इतर तुमच्याकडे दुसरे खते असतील तर तुम्हाला त्या खताची माहिती असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा डोज देऊ शकता.