पी एम किसान योजना pm kisan & Namo shetkri installment..
नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पीएम किसान योजनेचे सलग 6000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे सलग 6000 रुपये पाहिजे असेल तर, तुमच्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख जाहीर केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.
बांधवांनो नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचा तुमचा जर एखादा हप्ता राहिलेला असेल तर तुम्हाला तो हप्ता मिळवण्यासाठी केंद्रशासनाने जी माहिती दिलेली आहे ती पूर्णपणे करणे आवश्यक आहे. अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून सुद्धा त्यांना काही हप्ते मिळाले नाही.
ज्या शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही किंवा त्यात प्रॉब्लेम आहे, अशा शेतकऱ्यांनी लवकरच करून घ्यावी, 31 मार्च 2024 ही केंद्र शासनाची शेवटची संधी आहे. जे शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी आहे, आणि त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळत नसेल तर, त्या शेतकऱ्यांनी लवकरच केवायसी करावी. 31 मार्च नंतर हे शेतकरी अपात्र होणार आहे, त्यामुळे लवकर केवायसी करावी.