Pm kisan : पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी मिळणार..
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पीएम किसान योजनेबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे. मित्रांनो या योजनेचे आतापर्यंत 16 हप्ते अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात प्राप्त झालेले आहे. व शेतकरी आता आतुरतेने 17 व्या हप्त्याची वाट पाहत आहे. तर पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे. व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. ही संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Pm kisan 17 instalment
पी एम किसान योजना ही 2019 पासून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी वर्षाला सहा हजार रुपये मिळत असते. या योजनेचा हप्ता तर तुम्हाला माहीतच आहे दोन हजार रुपये. आणि आता त्या सोबतच राज्य सरकारने काढलेली नवीन योजना नमो शेतकरी योजना याद्वारे सुद्धा शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळत असते. या योजनेचे देखील तीन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहे.
28 फेब्रुवारी 2024 या दिवशी पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला होता. तसेच ज्या शेतकऱ्यांची ई -केवायसी पूर्ण झालेली नाही अशा शेतकऱ्यांना 17 वा हप्ता मिळणार नाही. या योजनेचा 17 वा हप्ता जून ते जुलै या दरम्यान वितरित करण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात मिळू शकतो. किंवा जुलै मध्ये पहिल्या आठवड्यात वितरित केला जाऊ शकतो. 17 instalment pm kisan