Mansoon update 2024 :- यंदा महाराष्ट्रात कसा राहणार पाऊस..?
सर्वप्रथम नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा किसान या वेबसाईटवर तुमचं अभिनंदन शेतकरी बांधवांनो 2023 झालेल्या पावसा संदर्भात आज आपण थोडीशी चर्चा करूया कि, 2023 मध्ये पाऊस अनेक जिल्ह्यात खूप कमी जास्त पडला होता, आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांना पाण्याची समस्या जाणून येत आहे. 2023 मध्ये खूप दुष्काळ पडला होता, आता सध्या काही काही विहिरीला किंवा तळ्याला पाणी सुद्धा नाही. 2023 मध्ये पावसाने मंद गती घेतलेली होती. तर चला आज पाहूया 2024 मध्ये कसा पडणार पाऊस.
यंदा महाराष्ट्रात पाऊस कसा होणार याकडे सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष वेधले आहे. तर यंदा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. की यंदा अल- नीनोचा प्रभाव नाही 2024 च्या मान्सून वरती, आणि तसेच एक आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्याला निनो सक्रिय होणार आहे.
रामचंद्र साबळे म्हणतात की 4 मार्च ते 20 मे पर्यंतच्या तापमानानुसार कोणत्या भागात कमी व कोणत्या भागात जास्त पाऊस पडेल असा अंदाज काढता येतो. रामचंद्र साबळे यांनी असा व्यक्त केला आहे की 20 मे नंतर कोणत्या ठिकाणी कमी व जास्त पाऊस पडेल याची संपूर्ण माहिती दिली जाईल.
यंदा देशभरात 96% ते 104% संपूर्ण देशभरात पर्जन्यमान होईल, असा अंदाज रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला तसेच संपूर्ण हवामानाबद्दल रामचंद्र साबळे यांनी असं सांगितलं की 1 जून रोजी संपूर्ण हवामान व्यक्त करेनं. ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा..!!