Havaman andaj : पावसाचा मुक्काम वाढला अवकाळी चे संकट या तारखेपर्यंत सतर्क..
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यात 12 मे ते 18 मे या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र, तसेच कोकणात, विजेच्या कडकडासह तसेच गारपीटीसह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
राज्यात मागील 2-3 दिवसापासून पूर्व मोसमी पाऊस सक्रिय झालेला दिसून येत आहे. अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. आणि हा पाऊस मात्र आता 18 मे पर्यंत पडण्याची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. काल अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती. आणि आजही काही भागात वातावरणात मोठा बदल झालेला दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पाणी वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. उद्या 13 मे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता तसेच विजेच्या कडकडासह, वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तरी यंदा राज्यात चांगल्या पावसाच प्रमाण वर्तवण्यात आलेला आहे. सर्वप्रथम मान्सून अंदमाणात धडकत असतो. यंदा 22 मे रोजी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे. Mansoon update panjab dakh
कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार
👉 येथे क्लिक करून पहा 👈