कापूस पिकाला दुसरी फवारणी कोणती करावी जबरदस्त रिझल्ट..!
नमस्कार शेतकरी आपल्या राज्यात कापूस पिकाचे भरपूर शेतकरी उत्पादन घेत आहेत, आणि आता सध्या अनेक शेतकऱ्यांची कापूस पिकाची पहिली फवारणी पूर्णपणे झालेली आहे, आता कापसाला दुसरी फवारणी, कधी करावी व कोणत्या औषध वापरावे, याच्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे, आपल्या पिकावरची प्रक्रिया पाहून आपण चांगल्या औषधाची निवड करू शकता.
कापूस पिकाला दुसरी फवारणी योग्य वेळ 40 ते 45 दिवसाची असल्यावरच करावी. जेणेकरून आपल्या पिकाची योग्य नियंत्रने तसेच भरपूर फुटवा, आणि भरपूर पाते येतील या साठी फवारणी करावी. फवारणी करताना साठवून ठेवलेल्या पाण्याचा न वापर करता चांगल्या पाण्याचा वापर करावा.
कापूस पिकावर दुसरी फवारणी कोणती करावी खालील प्रमाणे माहिती घ्यावी..? 👇🏻
1) पाते वाढीसाठी – टाटा बहार 15 लिटरच्या पंपासाठी 40ml वापरू शकता.
2) फळ फांद्याची वाढ करण्यासाठी – 12:61:00 विद्राव्य खत 15 लिटरच्या पंप साठी 70 ग्रॅम वापरू शकता.
3) मावा, तुडतुडे, थ्रिप्स, साठी – उलाला 15 लिटरच्या पंप साठी 8 ग्रॅम वापरू शकता.
4) बुरशीनाशक – रोको किंवा रेडोमिल गोल्ड पंधरा लिटरच्या पंप साठी 30 ग्रॅम घेऊ शकता.
सूचना :- पहिल्या फवारणी मध्ये केलेल्या औषधाचा वापर करू नये. तसेच फवारणी करताना औषधाचा प्रमाण योग्य तेवढेच टाकावे, किंवा तुम्ही अनुभवलेल्या औषधाचा वापर करू शकता, तसेच याच औषधाचा वापर करावा असे नाही. तुम्ही खाली यूट्यूब व्हिडिओ द्वारे सुद्धा पाहू शकता. 👇🏻