लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये या तारखेला जमा होणार..!
राज्य शासनाच्या माध्यमातून आता नवीन राबवली जाणारी योजना म्हणजे लाडकी बहिण योजना, या योजनेचे आतापर्यंत 15 लाख अर्ज राज्य सरकारकडे पात्र झालेले आहे. अजूनही बहुतांश महिला या योजनेच्या अपात्र यादीत आहेत, कारण अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अनेक समस्या आढळत आहे. किंवा खूप लोड घेत आहे. त्यामुळे अजून जास्तीत जास्त महिलांचे अर्ज बाकी आहे.
लाडकी बहीण योजनेचे शक्यतो आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता समोर आलेली आहे. तसेच या योजनेचे पैसे महिलांच्या 15 ऑगस्ट रोजी जमा केले जाऊ शकते, अशी माहिती सोशल मीडिया द्वारे समोर आली आहे. आता अनेक महिला या योजनेच्या पैशाच्या प्रतीक्षेत आहेत.
या योजनेची अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे महिलांना जास्त चिंता करण्याची गरज नाही. कारण आता अर्ज करण्यासाठी ज्या समस्या आढळत होत्या, त्या समस्यात आता लवकर सुधारणा करण्यात येईल अशी माहिती आदिती ताई तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे.