13 जुलैपर्यंत हवामान कसे राहणार पहा आत्ताच..!
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे, त्या अंदाजा द्वारे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस वातावरण कसे आहे, व कोणत्या भागात पाऊस पडेल, याची संपूर्ण माहिती त्यांनी दिली आहे. मागील 9 ते 10 दिवसापासून गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार, या जिल्ह्यात सरासरी 34% पावसाची नोंद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.( Today hvaman andaj imd)
रामचंद्र साबळे हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै पर्यंत, कोल्हापूर, धाराशिव, सातारा सोलापूर, वर्धा, यवतमाळ, नगर अकोला, अमरावती, बीड,भंडारा छत्रपती संभाजी नगर, या जिल्ह्यात तुरळीक भागात मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच मुसळधार ते जोरदार कोणत्या भागाला इशारा दिलेला आहे ते खाली पाहूया.
तसेच 13 जुलै दरम्यान नांदेड,पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, वाशिम, चंद्रपूर, बीड, हिंगोली, गोंदिया, लातूर, नागपूर, गडचिरोली चंद्रपूर, या जिल्ह्यात 13 जुलै पर्यंत रामचंद्र साबळे यांनी जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यांनी दिलेला हवामान अंदाज तुम्ही खालील युट्युब व्हिडियो द्वारे सुद्धा पाहू शकता. 👇🏻