मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म भरायची घाई करू नका..!
राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. पात्र महिलांना प्रति दीड हजार रुपये महिन्याचा लाभ मिळणार आहे. या योजनेची आता फॉर्म भरायची तारीख ही 1 जुलैपासून ते 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदतवाढ दिलेली आहे.
आतापर्यंत या योजनेचे एक जुलै पासून आज पर्यंत १५ लाख फॉर्म राज्य सरकारकडे पात्र झालेले आहे. अजूनही या योजनेसाठी अनेक महिलांचे अर्ज वंचित आहे. कारण नारीशक्ती ॲप मध्ये फॉर्म भरताना अनेक समस्या येऊ लागल्या.
तसेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरण्यासाठी खूप उशीर होऊ लागला किंवा साईट लोड घेऊ लागली. त्यामुळे अनेक महिलांचे अजून अर्ज झालेले नाही. फॉर्म भरायची तुम्ही घाई करू नका असं काल विधानसभेमध्ये स्पष्ट केल आहे.
कारण काल विधानसभेमध्ये बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यामध्ये या योजनेचे पोर्टल विकसित करण्यात येईल अशी घोषणा केली आहे. तसेच नारीशक्ती ॲप मध्ये सुद्धा सुधारणा करण्यात येणार आहे.