आज पासून मान्सूनचा जोर वाढणार जुलैमध्ये मुसळधार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. राज्यात मान्सून आतापर्यंत अनेक भागात पोहोचलेला आहे. परंतु अनेक भागात मान्सूनची गती मंदावलेली आहे. पंजाबराव डक यांनी जुलैमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी दिलेला अंदाज आपण खालील लेखाद्वारे जाणून घेऊया.
राज्यात 10 जुलैपर्यंत मान्सून अनेक भागात पोहोचणार आहे. तसेच ज्या भागात मान्सूनचा जोर कमी होता, त्या भागात आता लवकरच चांगला पाऊस पडणार आहे. आता पाऊस काही बंद पडणार नाही तो सुरू राहणार आहे परंतु भाग बदलत पडणार आहे. तसेच राज्यात 10 ते 15 जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता पंजाब डख यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव डख म्हणतात की यंदा जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. 13 ते 25 जुलै पर्यंत भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. काही भागात नद्या, नाल्या, ओढे सुद्धा वाहणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. अशी माहिती हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांसाठी दिली आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेला अंदाज तुम्ही youtube व्हिडिओ द्वारे सुद्धा देखील खाली पाहू शकता. 👇🏻