सोयाबीन पिवळी पडल्यावर कोणती फवारणी केली पाहिजे..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सोयाबीन पेरणी होऊन आता 20 ते 25 दिवस पूर्ण होत आलेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला खताचा पहिला डोज ही दिलेला आहे. तर काही शेतकऱ्यांचा अजून बाकी आहे . राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन पिवळी पडत आहे. याचे कारण काय आहे.?
सोयाबीन का पिवळी पडते ? काही जमिनीत दरवर्षी सोयाबीन पिवळी पडत असते. कारण त्या जमिनीत अन्नद्रव्याची कमतरता पडलेली असते. तर काही जमिनीत जास्त पाणी साठवून राहिल्याने ही सोयाबीन पिवळी पडते. तर तसेच वातावरण ढगाळ राहिल्यामुळे ही सोयाबीन पिवळी पडू शकते.
झिंक आणि फेरस या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे ही सोयाबीन पिवळी पडते. सोयाबीन न पिवळी पडण्यासाठी सोयाबीनला सूर्यप्रकाश हवा असतो. तसेच शेतातील राहिलेले पाणी काढून देण्याची आवश्यकता असते. सोयाबीनचा पिवळेपणा जाण्यासाठी 19:19:19 ( 100 ग्रॅम ) प्रतिपंपासाठी सोबत फेरस आणि झिंक असले मायक्रोन्युट्रीयंट ची फवारणी करू शकता.
यूट्यूब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा खोड नियंत्रणासाठी पाहण्यासाठी खाली पहा 👇🏻