जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडणार पंजाबराव डख..
नमस्कार शेतकरी मित्रांनो जून महिन्यामध्ये अनेक भागात 15 जून पर्यंत मुसळधार पाऊस पडलेला होता. परंतु 30 जून पर्यंत अनेक भागात मान्सूनचा खंड पडलेला होता. पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार 27 ते 30 जून दरम्यान काही भागात जोरदार ते मध्यम पाऊस पडला. Mansoon today update
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी काल १ जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. जुलै महिन्यात कोणत्या तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. व किती तारखेपर्यंत राज्यात मान्सून धुमाकूळ घालणार ही संपूर्ण माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.
पंजाबराव डख म्हणतात कि 3 जुलैपर्यंत मान्सून भाग बदलत पडणार आहे. परंतु 4 ते 11 जुलै दरम्यान मान्सून धुमाकूळ घालणार आहे. काही भागात नद्या,नाल्या, वाहतील असा पाऊस पडणार आहे. 11 जुलै पर्यंत मान्सून भाग बदलत पडणार आहे. असे पंजाबराव डख सांगतात.