कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती करावी. Kapus pahil

कापूस पिकाला पहिली फवारणी

कापूस पिकाला पहिली फवारणी कोणती करावी. Kapus pahili

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांची कापूस लागवड होऊन बरेच दिवस झालेले आहेत. कापूस पिकाला पहिली फवारणी करण्यासाठी 20 ते 25 दिवस पूर्ण हवे असते. कारण आपल्या पिकावर मावा, थ्रिप्स, तुडतुडे, अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. त्यासाठी आपल्याला चांगली फवारणी करावी लागते.

 

1 ) कीटकनाशकामध्ये सर्वप्रथम तुम्ही ( super confidor) याचा 15 लिटरच्या पंपसाठी 8 मिली चा वापर करू शकता. किंवा तसेच ( Actara ) या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही प्रति 15 लिटरच्या पंप साठी 10 ग्राम वापरू शकता. किंवा टाटा कंपनीच ( Rogor ) याचासुद्धा प्रतिपंपासाठी 25 मिली चा वापर करू शकता.

 

2) आता तसेच बुरशीनाशकाचा सुद्धा आपल्याला वापर करणे आवश्यक असते. पाहिलं बुरशीनाशक ( Indofil M45 ) याचं प्रमाण 15 लिटरच्या पंप साठी 40 ग्रॅम आहे. किंवा तसेच ( Upl saff ) या बुरशीनाशकाचा सुद्धा तुम्ही प्रतिपंपासाठी 40 ग्रॅम चा वापर करू शकता.

 

3) आपल्याला टॉनिकचा सुद्धा फवारणी मध्ये वापर करणे आवश्यक असते. पहिलं टॉनिक ( oxygen ) या टॉनिकच तुम्ही 15 लिटरच्या पंप साठी 50 मिली घेऊ शकता. कारण या औषधामुळे पिकाची जोरदार वाढ होते. किंवा हे टॉनिक उपलब्ध नसेल तर ( Biovita x ) याचा सुद्धा प्रति पंपासाठी 40 मिली चा वापर करू शकता.

 

पहिल्या फवारणी मध्ये एक टॉनिक तसेच १ बुरशीनाशक तसेच 1 कीटकनाशक किंवा विद्राव्य खताचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. किंवा तुम्ही अनुभवलेल्या औषधाचा सुद्धा वापर करू शकता. या दिलेल्याच नवे तर असं नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan