सोयाबीन पहिली फवारणी , खोड नियंत्रण फुटवे वाढ, संपूर्ण माहिती
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सध्या राज्यात अनेक शेतकऱ्यांच्या देखील पेरण्या झालेल्या आहेत. आणि सोयाबीन उगवून 7 ते 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. आपल्याला सोयाबीन पिकाच जास्त प्रमाणात जर उत्पन्न घ्यायच असेल तर, आपल्याला फवारणी खत व्यवस्थापन अनेक क्रिया कराव्या लागतात.
आपण सोयाबीनला फुटवे वाढीसाठी किंवा खोड नियंत्रणासाठी किंवा तसेच वाढ होण्यासाठी आपल्याला सोयाबीन पिकाची पहिली फवारणी करणे आवश्यक असते. आपल्या सोयाबीनला पहिली फवारणी करण्यासाठी 20 ते 25 दिवस पूर्ण लागतात.
आपल्याला पहिल्या फवारणी मध्ये चांगल्या कीटकनाशकाच वापर करायचा आहे. त्यामुळे खोडकिडीचे नियंत्रण होईल तसेच, रस्वसन किडीचे नियंत्रण होईल.
*त्यासाठी तुम्ही Alika कंपनीचं 15 लिटर पंपासाठी 10 मिली वापरु शकता. किंवा super profex याचा सुद्धा तुम्ही योग्य प्रमाणात वापर करू शकता. किंवा mectin चा सुद्धा वापर करू शकता.
*तुमच्या जर सोयाबीनची योग्य वाढ होत नसेल तर, तुम्ही mhadhan ( 19:19:19 ) याचा प्रतिपंपासाठी 75 ग्राम वापर करू शकता.
*तसेच सोयाबीनचे फुटवे वाढण्यासाठी तुम्ही isabion किंवा Biovita या दोन्ही टॉनिक पैकी तुम्ही एक चा वापर करू शकता.प्रति पंपासाठी 30 मिली टाकू शकता.
युट्युब व्हिडियोच्या माध्यमातून पाहण्यासाठी 👇🏻