जुलै महिन्यात पाऊस कसा राहील हवामान तज्ञ रामचंद्र साबळे..
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या पहिल्या अंदाजानुसार राज्यात काही भागात जून महिन्यात पावसाचा खंड पडलेला बघायला मिळाला आहे. तर काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडलेला आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.
काही भागात जून महिन्यात ढगफुटी पावसाची नोंद झालेली आहे, तर तसेच काही भागात पावसाचा खंड सुद्धा पडलेला आहे. जसा जून मध्ये पावसाचा खंड पडलेला होता तसाच खंड जुलै महिन्यात काही भागात सुद्धा पडू शकतो. असे हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले आहे.
जुलैमध्ये दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाडा विदर्भ , या तुरळीक ठिकाणी भागात हलक्या ते मध्यम तसेच काही भागात जोरदार पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यांनी दिलेला संपूर्ण अंदाज तुम्ही खालील युट्युब व्हिडीयोच्या माध्यमातून पाहू शकता👇🏻