खरीप हंगाम 2024-25 साठी खरीप पिकांचे हमीभाव जाहीर..
नमस्कार शेतकरी मित्रांनो अनेक शेतकरी शेती पिकामध्ये वेगवेगळ्या पिकाची लागवड करत असते. शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण दिलासा म्हणजे त्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळायला पाहिजे. शेतकरी मित्र पिकांचे चांगल उत्पन्न घेण्यासाठी वेगवेगळ्या फवारणी खते टाकत असते. तर जाणून घेऊया खरीप पिकांचे हमीभाव.
सरकारने मंत्री मंडळाच्या बैठकीत 19 जून रोजी खरीप हंगाम 2024- 25 साठी 14 पिकांचे हमीभाव जाहीर केलेले आहे. काही पिकांच्या हमीभावात वाढ झालेली आहे तर काही पिकांच्या हमीभावत वाढ झालेली नाही, तर पाहूया कोणत्या पिकाला काय भाव मिळालेला आहे.
1) सोयाबीन : सोयाबीनला मागील वर्षी 4600 रुपये हमीभाव होता. यंदा ४८९२ रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.
2) तूर : तुरीला मागील वर्षी 7000 हजार रुपये हमीभाव होता. यंदा 7750 रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.
3) भुईमूग : भुईमुगाला मागील वर्षी 6377 रुपये हमीभाव जाहीर केलेला होता. परंतु यंदा 6783 हमीभाव जाहीर झाला आहे.
4) मका : मकाला मागील वर्ष 2090 रुपये हमीभाव होता. यंदा मकाला 2225 रुपये भाव जाहीर झाला आहे.
नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार
तुम्हाला अनेक पिकांचे जर भाव जाणून घ्यायचे असतील तर खालील फोटो द्वारे तुम्ही राहिलेल्या पिकांचे सविस्तर भाव पाहू शकता. 👇🏻