Whether update मान्सून महाराष्ट्रात 7 जून आधीच दाखल होणार..?
यंदा मान्सून महाराष्ट्र मध्ये लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. तरी मागील 10 ते 15 दिवसापासून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. तरी आता यंदा अनेक शेतकऱ्यांचे मान्सून कडे लक्ष वेधले गेले आहे. मागील वर्षी दुष्काळ असल्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये पाण्याची अधिक टंचाई जाणून आली आहे. Mansoon update ( रामचंद्र साबळे )
दक्षिण अंदमान समुद्रामध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख बावीस मे असते परंतु यंदा अंदमान समुद्रामध्ये मान्सून 19 मे रोजीच दाखल झालेला दिसून येत आहे. तसेच श्रीलंकेत मानसून 26 मे च्या दरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे. आणि केरळमध्ये 1 जून अगोदरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
रामचंद्र साबळे म्हणतात की महाराष्ट्रात यंदा मानसून 7 जून आधी दाखल होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत 10 जून पर्यंत मान्सून हजेरी लावेल. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून 12 जून आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी अशा परिस्थितीत हवामान अंदाज व्यक्त केला आहे. तरी काही भागात 26 मे पर्यंत पावसाची शक्यता असेल. तरी सतर्क रहावे..
यूट्यूब द्वारे पाहण्यासाठी क्लिक करा