Mansoon comming : यंदा मान्सून लवकरच अंदमानात येणार.
नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात 7 मे ते 15 मे दरम्यान अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि 7 तारखेपासून पूर्व मोसमी पाऊस ही सक्रिय झालेला दिसून येत आहे. काल परवा अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती. तर यंदा लवकरच मान्सूनचं आगमन होणार आहे याचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे हे आपण जाणून घेऊया.
सध्या राज्यात वारे वाहण्याला सुरुवात झाली आहे. वारे हेच खरे पावसाचे स्थान आहे. त्यामुळे मान्सून आगमनाची तयारी देखील सुरू झालेली आहे. तसेच दक्षिण अंदमाणात समुद्रात मान्सूनच आगमन २ ते ३ दिवसात होईल असा अंदाज हवामान अभ्यासक रामचंद्र साबळे यांनी वर्तवला आहे. निर्धारित वेळेपेक्षा यंदा लवकरच मान्सूनचं आगमन होईल.
तसेच आता दररोज तापमानातही देखील वाढ होत जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, याचे तापमान 30° ते 31° सेल्सिअस वाढले आहे. तरी यंदा लवकरच मान्सूनच आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी जाहीर केले आहे.
यूट्यूब दारे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈