Mansoon comming soon राज्यात 2024 चा पहिला पाऊस कधी पडणार..

Mansoon comming soon

Mansoon comming soon राज्यात 2024 चा पहिला पाऊस कधी पडणार..

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो बऱ्याच काही दिवसापासून राज्यात उष्णतेचा प्रभाव अधिक झाला. आणि शेतकरी या उन्हाच्या चटक्यामुळे हैराण झालेले आहे. शेतकऱ्यांसाठी मान्सून हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गेल्या वर्षी राज्यात कमी पाऊस पडल्याने अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती. तसेच शेतकरी यंदा पावसाच आगमन कधी होईल या प्रतीक्षेत आहेत. तर जाणून घेऊया 2024 मान्सूनच आगमन कधी होईल. Panjabrao dakh mansoon update

राज्यात पंजाबराव डख यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार 2024 चा पहिला पाऊस 12 जून ते 13 जून या दरम्यान पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच हा पाऊस मात्र पेरणीयोग्य नसणार आहे. 22 जून नंतर पेरणी योग्य पावसाला सुरुवात होईल. जूनच्या शेवटच्या आठवड्यात बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील होतील. अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

तसेच आता 7 मे ते 11 मे या दरम्यान अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात सुद्धा आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. आणि यंदा जुलैमध्ये अवकाळी पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. असे पंजाब डख सांगतात. जर अचानक हवामानात बदल झाला तर लवकरच तुम्हाला संदेश दिला जाईल.

 

युट्युब द्वारे व्हिडिओ पाहण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit mazakisan