राज्यात 28 ते 30 एप्रिल या दरम्यान काही भागात अवकाळी पाऊस. today mansoon update
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी काल 27 एप्रिल 2024 रोजी नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी वर्तवलेला आहे. तर जाणून घेऊया हवामान अभ्यासक काय म्हणतात, शेतकऱ्यांनो मागील 10 ते 15 दिवसापासून अनेक भागात अवकाळी पाऊस, तसेच गारपीटी सह आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडला आहे. अजून पावसाचे वातावरण किती दिवस राहणार आहे. हे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Panjabrao dakh
तसेच 30 एप्रिल पासून राज्यात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे, आणि उन्हाचा कडाका वाढण्याची तीव्रता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच जेवढे दररोज ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस दिसून येत होते. तेवढा पाऊस मे महिन्यात नसणार आहे त्यामुळे मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढणार आहे. तरी शेतकऱ्यांनी आपण आपली काळजी घ्यावी व जनावरांची सुद्धा देखील काळजी घ्यावी. असा संदेश पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
राज्यात 28 ते 30 एप्रिल या दरम्यान उत्तर महाराष्ट्र मध्ये तुरळीक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मराठवाड्यातील तुरळीक ठिकाणी, आणि पश्चिम विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाची व विजेच्या कडकडेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे. हा पाऊस सर्वच ठिकाणी पडणार नव्हे तर काही भागात तुरळीक ठिकाणी पडणार आहे. अशी माहिती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.