अजून राज्यात पावसाचा किती दिवस मुक्काम.. Mansoon today update
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील 10 ते 12 दिवसापासून पावसाने अनेक जिल्ह्यात किंवा राज्यात हजेरी लावलेली होती. त्यासोबतच अनेक भागात गारपीट सुद्धा देखील पहायला मिळाली होती. आणि काल सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ देखील सुद्धा घातला होता. तर असेच अजून पावसाचे वातावरण किती दिवस राहील..? व कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडेल.? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मित्रांनो काल 24 एप्रिल रोजी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील तुरळीक जिल्ह्यात 28 एप्रिल पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी शेतकऱ्यांनी 28 एप्रिल पर्यंत सतर्क राहावे. असे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सल्ला दिला आहे.
पंजाबराव डख यांनी काल दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यात सांगली, सातारा, लातूर, जालना, बीड, सोलापूर, नांदेड, अशा तुरळीक जिल्ह्यात एक-दोन दिवसातून एकदा तरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर अचानक हवामान अंदाजात बदल झाला तर संदेश द्वारे कळवण्यात येईल.. ( panjabrao dakh )