राज्यातील या जिल्ह्यात 28 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस.. Mansoon update
पंजाबराव डख यांनी 20 एप्रिल रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्या हवामान अंदाज याद्वारे राज्यात अजून किती दिवस अवकाळी पावसाचे बाकी आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या भागात पाऊस पडणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही खालील लेखाद्वारे पाहू शकता. 👇
नमस्कार शेतकरी मित्रांनो काल अनेक ठिकाणी गारपीटीने तसेच मुसळधार पावसाने सुद्धा हजेरी लावली होती, पंजाबराव डख यांनी सांगितल्यानुसार मागील 9 ते 10 दिवसापासून अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, तर आता शेतकऱ्यांसाठी पुन्हा एक महत्त्वपूर्ण बातमी 28 तारखेपर्यंत 10 ते 12 जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांनी वर्तवलेली आहे.
मित्रांनो 21 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान महाराष्ट्रातील दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच सातारा, सांगली सोलापूर, लातूर, कोल्हापूर, बीड जालना, हिंगोली, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये दोन दिवसात एकदा तरी पाऊस पडण्याची शक्यता 28 तारखेपर्यंत वर्तवण्यात आलेली आहे.