राज्यात या भागात २ ते ३ दिवस वादळी वारे गारपीट, पावसाचा इशारा..
नमस्कार शेतकरी मित्रांनो ३ एप्रिल पासून अनेक भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. तसेच आता चार ते पाच दिवसांपूर्वी अनेक भागात गारपीट सुद्धा देखील झालेली आहे. आणि अनेक शेतकऱ्यांचे देखील नुकसान सुद्धा पाहायला मिळत आहे. तसेच काही काही भागात वादळी वार्यामुळे , झाडाची तोडमोड सुद्धा झालेली आहे. तर अजून किती दिवस पावसाचे संकट बाकी आहे. हे आपण या लेखाच्या माध्यमातून खालील प्रमाणे पाहूया.
तरी या एप्रिल महिन्याच्या कालावधीमध्ये अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरू आहे. तसेच देखील काही शेतकऱ्यांचे फरतड कापसाची वेचणी सुद्धा सुरू आहे. आणि यातच पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. सध्या शेतकऱ्यांची खूप धावपळ सुरू आहे. तरी 18 एप्रिल 2024 पर्यंत पाऊस राहण्याची शक्यता पंजाबराव डख यांनी नवीन अंदाजानुसार वर्तवलेली आहे.
तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात भाग बदलत गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. आणि तसेच मराठवाड्यातील तुरळीक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे. तरी शेतकऱ्यांनी 18 एप्रिल पर्यंत सतर्क राहावे. व आपण आपली काळजी घ्यावी, तसेच पिकाची सुद्धा आणि जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी. असा संदेश हवामान अभ्यासक पंजाबराव डख साहेब यांनी सांगितला आहे.