कोणत्या शेतकऱ्यांची होणार कर्ज माफी..2024 अखेर GR आला
राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन GR आलेला आहे. या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 30 मार्च 2024 या रोजी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी खालील प्रमाणे सविस्तर माहिती वाचा.
राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करण्याची योजनेअंतर्गत 52.562.00 लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. ती कर्ज माफी या योजनेसाठी या कालावधीमध्येच बाधित झालेल्या शेतकऱ्यांनाच पिक कर्जाची माफी करण्यात येणार आहे.
तसेच राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्यक वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.. तसेच सन 2023- 24 साठी सन 2023 च्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या 379.99 लाख इतक्या निधी पैकी 114 लाख रुपये फक्त मंजूर करण्यात आला आहे.