राज्यात या तारखेपासून कडक सूर्यदर्शन पडणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी बांधवांची सोयाबीन देखील काढणीला आलेली आहे, आणि अशा वातावरणामध्ये मान्सून देखील धुमाकूळ घालत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांचे देखील सोयाबीन आणि कापूस पिकाचे नुकसान होत आहे, मागिल 7 ते 8 दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कायम सुरूच आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीची चिंता पडलेली आहे.
सर्वांचे लाडके हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्यात कोणत्या तारखेपासून कडक सूर्यदर्शन पडणार आहे व किती तारखेपर्यंत पावसाचा खंड राहणार आहे, याची संपूर्ण माहिती या अंदाजाद्वारे त्यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनो 12 – 13 सप्टेंबर पर्यंत राज्यातील तुरळीक ठिकाणी मान्सून पडणार आहे, तरी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 13 सप्टेंबर पासून आणि भागामध्ये सूर्यदर्शन होण्यास सुरू होणार आहे, असे पंजाबराव म्हणतात. ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणीला आलेली आहे अशा शेतकऱ्यांनी मान्सूनची उघडीप पाहून व सूर्यदर्शन पाहून काढून घ्यावी, अचानक वातावरणात बदल झाला तर तुम्हाला लवकर संदेश दिला जाईल.
तुम्ही जर माझा किसान या वेबसाईट वरती नवीन असाल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा व दररोज नवनवीन माहिती माहिती अगदी मोफत मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद