पुढील चार दिवस या भागात मुसळधार पाऊस.. पंजाब डख
नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये अनेक दिवसापासून काही भागांमध्ये वातावरण कोरडे झालेले आहे, तर काही भागांमध्ये मान्सून कायम सुरूच आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान अभ्यासक सर्वांचे लाडके पंजाबराव डख यांनी पुढील चार दिवस मान्सून कसा राहील याबद्दल 21 ऑगस्ट रोजी नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे.
राज्यामध्ये 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान सगळीकडेच चांगला मानसून राहणार आहे, परंतु बीड पैठण श्रीरामपूर नगर वैजापूर कोकण या भागात मात्र अति मुसळधार पाऊस पडणार आहे, असे पंजाबराव डख म्हणतात. तरी ज्या शेतकऱ्यांचे शेतातील काम व मुग काढणे सुरू आहे अशा शेतकऱ्यांनी हवामान कोरडे पाहून कामे करून घ्यावे.
राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा या भागाकडे 22 ऑगस्ट पासून ते 27 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत जोरदार मान्सून पडणार आहे. तसेच 27 ते 20 ऑगस्ट दरम्यान हवामान पुन्हा कोरडे राहणार आहे परंतु पोळ्याला पुन्हा जोरदार मान्सून येणार आहे. असे पंजाबराव डख सांगतात.
याबद्दल तुम्हाला पंजाबराव डख यांनी दिलेली अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खालील यूट्यूब व्हिडिओ नक्की पहा. आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.