तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आले नाहीत..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्ट रोजी पहिला आणि दुसरा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा केलेला आहे, यात अनेक महिलांचे अर्ज पात्र असून सुद्धा त्या महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले नाहीत, अशा महिलांनी कोणते काम केले पाहिजे आपण या लेखाच्या द्वारे माहिती जाणून घेऊया.
सर्वप्रथम महिलांनी आपण केलेला अर्ज तो पात्र झालेला आहे की नाही तसेच आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेले आहे, या सर्व समस्या तुम्ही एकदा तपासावून घ्याव्या. तुमचे आधार कार्ड जर बँक खात्याला लिंक केलेले नसेल तर तुम्हाला हप्ता वितरित केला जाणार नाही, त्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आधार बँक ला लिंक आहे का हे चेक करावे.
तसेच ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही अशा महिलांच्या खात्यात पुढच्या महिन्यांमध्ये सोबतच चार हजार पाचशे रुपये जमा करण्यात येणार आहे, त्यासाठी महिलांनी गोंधळावून जाऊ नये, तसेच ज्या महिलांचे अर्ज करायचे अजून बाकी आहेत अशा महिलांनी लवकरच अर्ज करून घ्यावे. तुम्हाला अर्जासाठी 21 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, या दरम्यान तुम्ही कधीही अर्ज करू शकता.