कापूस आणि सोयाबीन अनुदान तुम्हाला मिळणार का…?
नमस्कार शेतकरी मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टर च्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार अशी घोषणा केलेली होती, आणि या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरले आहे, व कोणत्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ भेटणार आहे, ही संपूर्ण माहिती या लेखाद्वारे आपण पाहूया.
शेतकरी बांधवांनो मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात देखील नुकसान ही झालेली होती, अनेक शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला हमीभाव योग्य तो नव्हता, तरी पण शेतकऱ्यांनी आर्थिक समस्या मुळे कापूस आणि सोयाबीन विकून टाकलेली होती. या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा ही राज्य सरकारने मंजूर केलेली होती.
ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाची ई – पिक पहाणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित देण्यात येणार आहे, तुम्हाला 2023 च्या सातबारा वरती कळेल की सोयाबीन आणि कापूस किती क्षेत्रावर ई – पिक पाहणी केलेली आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.