सोयाबीन ला येतील फुलच फुलं ही फवारणी घ्या…!
नमस्कार शेतकरी यंदा राज्यात सोयाबीनची जास्त प्रमाणात पेरणी झालेली आहे, सध्या पावसाने ही सोयाबीनला चांगलीच साथ दिलेली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या आता सोयाबीन पिकाला फुले येण्यास सुरुवात झालेली आहे, अशा कालावधीमध्ये जास्त फुलधारणा येण्यासाठी कोणती फवारणी करावी, याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
आपल्या पिकावर सध्याच्या अवस्थेमध्ये अळी नियंत्रण करणे अतिशय महत्त्वपूर्ण असते, अळी नाशक नियंत्रणासाठी तुम्ही फेम किंवा अम्प्लीगो यापैकी एक कोणतही घेऊ शकता. सोयाबीन पिकाच आपल्याला जास्त प्रमाणात उत्पन्न जर घ्यायच असेल तर फुलधारणा जास्त करणं हे गरजेचं असतं, जेणेकरून आपल्या उत्पन्नात देखील वाढ होते.
सोयाबीनला जास्तीत जास्त फुल येण्यासाठी टाटा बहार, फॅन्टाक प्लस, किंवा इसाबियन यापैकी एक टॉनिक घेऊ शकता, किंवा तसेच अमिनो ॲसिड असलेलं कोणत्याही टॉनिक घेऊ शकता. तसेच त्यासोबत 13:40:13 किंवा 00:52:34 हे विद्राव्य खत घेऊ शकता.