सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दहा हजार अनुदान खात्यात..!
कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादित अनुदान देण्यासाठी 29 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये ई पिक पहाणी ची नोंद पूर्ण केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाणार आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक बांधवांसाठी 4192 कोटी रुपयाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस पिकाला दुष्काळामुळे मोठा झटका बसलेला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची देखील उत्पन्नात मोठी घट झालेली होती. तसेच या पिकाला योग्य तो भाव ही मिळत नव्हता, त्यामुळे राज्य सरकारने अर्थसंकल्पात याची घोषणा समोर मांडलेली होती. या योजनेची अंमलबजावणी ही सुरू केलेली आहे, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार दोन हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येणार आहे.
मागील वर्षीचा ई पिक पाहणीचा डाटा पाहूनच अनुदानाचे वाटप वितरीत केले जाणार आहे. आता या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आता लवकर शेतकऱ्यांच्या देखील खात्यावर अनुदानाचे वाटप वितरित केले जाणार आहे. याबद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा 👇🏻