आज येत्या 3 ते 4 तासात या भागात मुसळधार पावसाची शक्यता..!
हवामान विभागाच्या माहितीनुसार आज अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, तरी आतापर्यंत अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे, अजून तीन ते चार तासात कोणत्या भागात जोरदार पावसाची शक्यता दिलेली आहे, संपूर्ण माहिती जाणून घेऊया सविस्तर.
पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गांधी, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, अमरावती, वर्धा, नागपूर, या भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तरी या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे, अशी माहिती हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेली आहे.
तसेच पालघर, नाशिक, धुळे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, वाशिम, लातूर, नांदेड, यवतमाळ, तसेच राहिलेल्या उर्वरित भागात तुरळीक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.