आज आणि उद्या मान्सूनचा जोर कुठे पंजाबराव डख सांगतात..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचे लाडके पंजाबराव डख हवामान अभ्यासक नीट 26 जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. तर पुढील 2 ते 3 दिवस मान्सून कोणत्या भागात जोर धरेल व कोणत्या भागात रिमझिम स्वरूपाचा पडेल, याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया. Mansoon update panjabrao dakh
सध्या राज्यात मागील 7- 8 दिवसापासून अनेक भागात रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे, तर काही भागात मुसळधार पावसाने ही धुमाकूळ घातलेला आहे, पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 2 ऑगस्टपर्यंत भाग बदलत मानसून सुरूच राहील.
तसेच राज्यात 27 जुलै आणि 28 जुलै दरम्यान संपूर्ण विदर्भ,आणि उत्तर महाराष्ट्र, आणि तसेच मुंबई या भागात मान्सूनचा जोर राहणार आहे, असे पंजाब डख सांगतात. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सूनचा जोर कमीच राहील, रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल. पंजाबराव डख म्हणतात की मानसून सतत चालूच राहणार आहे उघडीप पाहून शेतीची कामे करून घ्यावी.