या भागात मान्सूनचा जोर वाढणार सूर्यदर्शन कधी होणार…!
हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी 24 जुलै रोजी शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, त्या अंदाजाद्वारे राज्यात 2 ऑगस्ट पर्यंत भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. तर राज्यात सूर्यदर्शन कधी होणार याबाबत अधिक माहिती खालील लेखाच्या द्वारे जाणून घ्या.
सध्या राज्यामध्ये मागील 4 ते 5 दिवसापासून अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस चालू आहे, तसेच काही भागांमध्ये मुसळधार ही पाऊस सुरू आहे, सध्या शेतकऱ्यांचे कामे शेतात बंद झालेले आहे, तरी अजून 2 ऑगस्ट पर्यंत मुंबई सर्व कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्र या भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
तसेच आज पासून 27 जुलै पर्यंत मान्सूनचा अधिक चोर वाढणार आहे, तरी शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, आणि परत तसेच 30/31/01/02/ या तारखे दरम्यान सुद्धा अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, असे पंजाबराव डख म्हणतात, राज्यात सूर्यदर्शन 2 ऑगस्ट नंतर होण्याची शक्यता आहे.