आज येत्या 24 तासात या भागात मुसळधार पावसाचा इशारा..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार काल अनेक भागात जोरदार पाऊस झालेला आहे आणि काही भागात मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरू होता. आज कोणत्या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, व कोणत्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल हा संपूर्ण अंदाज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज येत्या 24 तासात रायगड आणि सातारा या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, तसेच, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, या भागात हवामान खात्याने मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.
तसेच आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा चंद्रपूर, या भागात सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा वर्तवलेला आहे, तसेच राहिलेल्या अनेक भागांमध्ये आज तुरळीक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. Mansoon update of imd