मान्सूनचा जोर वाढणार या जिल्ह्यात जोरदार पाऊस..!
हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी एक नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे, आपण त्यांनी दिलेला अंदाज जाणून घेऊया. राज्यात सध्या मागील दोन ते तीन दिवसापासून अनेक भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. आणि काही भागात मुसळधार पावसाने ही धुमाकूळ घातलेला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असेल, तसेच मध्य महाराष्ट्रात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील. तर तसेच पश्चिम महाराष्ट्रात काही दिवशी जोरदार पाऊस पडेल तर काही दिवस पावसाची उघडीप सुद्धा राहू शकते. असे हवामान तज्ञ रामचंद्र साबळे म्हणतात.
तसेच राज्यामध्ये अनेक भागात नुसते ढगाळ वातावरण सुद्धा राहील, त्याचबरोबर कोकण वगळता इतर भागांमध्ये पावसाची उघडीप सुद्धा राहण्याची शक्यता आहे. तर या आठवड्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेली आहे, ही माहिती न्युज पेपर द्वारे समोर आलेली आहे.