Kusum solar मागेल त्याला सौर पंप कधी मिळणार..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी आपल्याला दिवसभर लाईनीची सारखी वाट बघावी लागत असते, तसेच गॅप नुसार रात्री सुद्धा लाईन येत असते, रात्री लाईन असल्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण रात्रभर पाणी देणे सुरूच असते, त्यासाठी मागील काही दिवसापासून मागेल त्याला सौर पंप योजना ची घोषणा केली होती.
तसेच राज्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सौर पंप प्राप्त झालेले आहे, परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत परंतु सौर पंप अजून मिळाले नाही, तसेच आता मागील काही दिवसात 35 हजार हून अधिक अर्ज केलेले आहेत. आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुढील दोन वर्षात 9 लाख 5 हजार सौर पंप दिले जाणार अशी घोषणा केली होती.
राज्यातील अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागेल त्याला सौर पंप योजनेची घोषणा दिलेली होती, परंतु या योजनेचा अजूनही शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नव्हता, या योजनेचे अर्ज ऑगस्ट महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे, या योजनेची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. Kusum solar yojna