लाडकी बहिण योजनेत या महिलांना अर्ज भरता येणार नाही..!
सर्वप्रथम महिलांनो तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला दीड हजार रुपये महिना मिळणार आहे, आतापर्यंत 15 लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केलेला आहे, तरी अजून बहुतांश महिला अर्ज भरण्याच्या प्रतीक्षेतच आहेत, अर्ज भरण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर पाहूया कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔶 तुमच्या कुटुंबातील जर एखादी व्यक्ती सरकारी नोकरी करत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
🔶 ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखा हुन अधिक असेल तर तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार नाही, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्ही पात्र ठरणार आहे.
🔷 वय 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, या खालील किंवा अधिक वय असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
🔷 एका कुटुंबातील दोनच महिलांना लाभ घेता येणार आहे, 21 वर्षांपुढील अविवाहित सुद्धा.
🔶 या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र रहिवासी असणे बंधनकारक आहे.
लाडकी बहीण योजनेतून पात्र महिलांना राज्य शासनामार्फत वर्षाला 18000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे, प्रत्येकी दीड हजार रुपये महिना निश्चित केला आहे. तुम्ही जर पात्र असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. संपूर्ण लागणाऱ्या कागदपत्राच्या द्वारे अर्ज भरू शकतात.