सोयाबीन मध्ये केना, गाजरगवत संपूर्ण नायनाट जबरदस्त तणनाशक
मित्रांनो सोयाबीनची पेरणी होऊन आता बहुतांश दिवस पूर्ण झालेले आहे. आणि आता सोयाबीनमध्ये केना, गाजरगवत याचा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे. शेतकरी मित्रांनो आपल्याला येथे चांगल्या तणनाशकाचा वापर करायचा आहे जेणेकरून तंत्र नियंत्रण चांगले होईल. सोयाबीन मध्ये गाजर गवत किंवा केना असेल तर ही फवारणी करा संपूर्ण नायनाट जबरदस्त रिझल्ट मिळेल.
तसेच सोयाबीन पिकांमधील गवत दोन ते चार पानावर असल्यावर फवारणी केल्यास जबरदस्त रिझल्ट मिळतो, गवत थोडं जरी मोठ झाल तर हवा तसा रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी गवत 2 ते 4 पानावर असल्यावरच फवारणी करावी.
कारण जेणेकरून आता सोयाबीन पिकाची जोमात वाढ होत चाललेली आहे, आणि गवताच नियंत्रण न केल्याने गवत खालीच झाकून जाते. त्यासाठी लवकर तणनाशकाचा वापर केला पाहिजे.
सोयाबीनमध्ये गाजरगवत, केना किंवा इतर गवत असेल तर ( ओडिसी 40 ग्रॅम एकर ) सोबत ( Qurin 8 ग्रॅम एकर ) या दोन्ही औषधाची एकत्र मिसळून फवारणी केल्यास तुम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो. किंवा परशुट आणि क्लोबिन या दोन्ही तणनाशकाची एकत्र मिसळून योग्य प्रमाणात फवारणी करू शकता.