सोयाबीन फुलावर असताना या ४ चुका अजिबात करू नका..!
सर्व प्रथम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला जर सोयाबीन च 15- 21 क्विंटल उत्पन्न घ्यायच असेल तर आपल्याला महत्त्वपूर्ण म्हणजे खत व्यवस्थापन, फवारणी, पाणी व्यवस्थापन, याची संपूर्ण दक्षता घ्यायला हवी असते, जेणेकरून आपल्याला सोयाबीन च जास्त उत्पन्न होईल. तर सोयाबीन फुल अवस्थेत असताना आपल्याला कोणत्या चार गोष्टी करायच्या नाहीत हे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहूया.
सोयाबीनला जास्त शेंगा येण्यासाठी महत्वपूर्ण म्हणजे फुलधारणा जास्त प्रमाणात होणे, आणि फुलधारणा झाल्यावर पण फुल गळून पडू नये, यासाठी आपल्याला अनेक बाबी करायच्या आहेत, तरी अनेक शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेण्यासाठी नवीन असतात, त्यांना जास्त सोयाबीन पिकाचा अनुभव ही देखील नसतो, त्यामुळे त्यांना जास्त उत्पन्न मिळत नाही.
सोयाबीन फुलावर असताना या 4 चुका अजिबात करू नका..👇🏻
सोयाबीन फुल अवस्थेत असताना तणनाशकाची फवारणी करू नये, तसेच नत्र युक्त खताचा वापर करू नये, तसेच अळी नियंत्रण भारी फवारणी करू नये, आणि फवारणी करताना चुकीचं औषध वापरू नये आणि जास्त प्रमाणातही देखील वापरू नये, जेणेकरून तुमच्या सोयाबीन पिकावर आलेले फुल गळून पडणार नाही.