सोयाबीन पिकाला दुसरी फवारणी कोणती करावी जबरदस्त रिझल्ट..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची सोयाबीन उगवून आता एक महिना पूर्णपणे झालेला आहे, आणि सध्या आता सोयाबीन पिकाची पहिली फवारणी ही आणि शेतकऱ्याची पार पडलेली आहे, आणि आता शेतकरी सोयाबीन दुसऱ्या फवारणीच्या प्रतीक्षेत आहेत. सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती करावी या लेखातून संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
सोयाबीन दुसरी फवारणी करत असताना आपल्या सोयाबीनला 45 ते 50 दिवस पूर्ण झालेले गरजेचे असते. आणि तसेच पहिली फवारणी होऊन 20 ते 25 दिवस ही झालेले पाहिजे, तेव्हाच आपल्याला दुसरी फवारणी घेणे गरजेचे असते. सोयाबीनची दुसरी फवारणी ची योग्य वेळ 45-50 दिवस आहेत.
1) सोयाबीन मध्ये पान खाणारी आळी असेल तर – ( mectin ) 15 लिटरच्या पंप साठी 12 ग्रॅम घेऊ शकता.
2) जर तुमच्या सोयाबीनची भरपूर प्रमाणात वाढ होत असेल तर नियंत्रणासाठी तुम्ही – ( Taboli ) 3 मिली प्रतिपंपासाठी घेऊ शकता.
3 ) सोयाबीन पिकाची कमी वाढ होत असल्यास – ( tata bahaar ) 40 मिली प्रति पंपासाठी वापरायचा आहे.
4) सोयाबीन चे फुटवे वाढण्यासाठी – ( 12:61:0) या विद्राव्य खताचा प्रति पंपासाठी 100 ग्रॅम वापरू शकता.
5) सोयाबीन बुरशीनाशक ( रोको – किंवा साफ ) प्रति पंप साठी 30 ग्रॅम घेऊ शकता.