सोयाबीन तणनाशक वापरताय थांबा अगोदर काळजी घ्या..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन पेरणी आता अनेक शेतकऱ्यांची पार पडलेली आहे. आणि आता सोयाबीन मध्ये तण ही उगवायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी यासाठी तण नियंत्रणासाठी सोयाबीन पेरणीनंतर 21 दिवसांनी तननाशक वापरतात. तर काही 48 ते 72 तासाच्या दरम्यान सुद्धा वापरतात. जे शेतकरी 21 दिवसांनी तननाशक वापरणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे.
तुम्ही आता 21 दिवसांनी सोयाबीन तन नाशक वापरणार आहेत तर मग तुम्हाला कोणत्या बाबींची काळजी घ्यावी लागणार आहे. हे पण जाणून घेऊया. अनेक भागातील शेतकऱ्यांची अजून तणनाशकाची फवारणी बाकी आहे. तणनाशकाची फवारणी करताना आपल्याला खालील मुद्द्यांची काळजी घ्यायची आहे.
1) तुम्ही घेतलेल्या तणनाशकाच योग्य प्रमाणात डोज दिला पाहिजे.
2) सोयाबीन पेरणीनंतर तणनाशकाची वेळ 18 ते 21 दिवस
3) तण ३ ते ४ पानावर असल्यावरच नियंत्रण होत, फवारणी 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान झाल्यास नियंत्रण होत नाही.
4) फवारणी करताना आपल्या जमिनीत ओल असावी.
5) वाऱ्याची दिशा बघून फवारणी करावी.
6) फवारणीस स्वच्छ पाणी वापरावे.