शेतकऱ्यांनो या तारखेपर्यंत पाऊस थांबणार त्यानंतर पुन्हा सुरू..!
आत्ताचे सर्वांचे लाडके ग्रामीण भागातील नवीन हवामान अभ्यासक तोडकर साहेब यांनी दिलेल्या 28 जुलै रोजी च्या माहितीनुसार त्यांनी सांगितले होते की 29 जुलैला अनेक भागात सूर्यदर्शन देखील होणार आहे. आणि त्यांनी दिलेला अंदाज पूर्णपणे खरा ठरलेला आहे. तर अजून राज्यात किती दिवस मान्सूनची उघडीप राहील जाणून घेऊया.
राज्यात मागील अनेक दिवसापासून रिमझिम मान्सून कायम सुरूच आहे. आणि शेतकऱ्यांना ही शेती कामे करायला वापसा होत नाही, आणि शेतकऱ्यांच्या अजूनही फवारण्या, खते, खुरपणी, पाळी, अशा अनेक समस्या अजूनही बाकी आहे. काल राज्यातील बहुतांश भागात देखील सूर्यदर्शन पडलेले होते आणि शेतकऱ्यांचे कामे ही सुरू होते.
राज्यात आज अनेक भागात ही देखील सूर्यदर्शन देखील राहणार आहे, तरी शेतकऱ्यांनी उघडीप पाहून शेतीची कामे पूर्ण करून घ्यावी, राज्यात पुन्हा 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान भाग बदलत मान्सून पडणार आहे. तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात मान्सून जास्त वेळ उघडीप घेणार आहे.