लाडक्या बहिणींना खुशखबर या तारखेला ३ हजार जमा..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून एक जुलैपासून सुरू झालेली आहे. या योजनेमध्ये पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावे लागणार आहेत. आतापर्यंत बहुतांश महिलांनी अर्ज केलेले आहे. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये केव्हा खात्यात जमा होणार.
लाडकी बहिणी योजनेतील पत्र महिलांना जुलै महिन्याचा पहिला हप्ता व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता असे दोन हप्ते तीन हजार रुपयाचे 19 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकते, अशी माहिती अजित दादा पवार यांच्या हस्ते समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना लवकरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना राबवली जाणार आहे, या योजनेचे मागील 10 ते 15 दिवसापासून अर्ज सुरू झालेले आहेत. आणि अनेक महिलांनी अर्ज ही केलेले आहे, आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अनेक समस्या सध्या आढळत होत्या त्यामुळे अजून अनेक महिलांचे अर्ज बाकी आहेत. अर्जासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.