लाडकी बहीण योजना राज्यात किती दिवस चालू राहणार…!
लाडकी बहीण योजनेचे सध्याच्या कालावधीमध्ये भरपूर केलेले महिलांनी अर्ज अप्रोल व्हायला सुरुवात झालेली आहे, तसेच या योजनेमधी भरपूर महिलांचे अर्ज रिजेक्ट सुद्धा झालेले आहे, त्यासाठी सध्या अर्ज दुरुस्ती करणे किंवा बँक खात्याला आधार लिंक करणे या अनेक समस्या सुरू आहेत. अर्ज करण्याबाबत चर्चा ही मात्र कायम सुरूच आहेत,
महिलांच्या मनामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्न पडलेले आहे की ही योजना मात्र किती दिवस चालू राहणार आहे, व आम्हाला या योजनेचा लाभ किती मिळेल, याबाबत अजितदादा पवार यांनी महिलांसाठी उत्कृष्ट माहिती दिलेली आहे, अजित दादा पवार म्हणाले की येत्या विधानसभेत आम्हाला महायुती सरकारने परत संधी दिली तर लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहील.
तसेच जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्या महिलांचे अर्ज पात्र झालेले आहे अशा महिलांना येत्या 17 ऑगस्ट रोजी जुलै महिन्याचा पहिला हप्ता आणि ऑगस्ट चा दुसरा हप्ता एकूण 3000 रुपये आधार लिंक बँक खात्याला वितरित केले जाणार आहे. ज्या महिलांचे अर्ज अजून बाकी आहेत, अशा महिलांनी 31 ऑगस्ट पर्यंत करून घ्यावे.