लाडकी बहीण योजना याच महिलांच्या खात्यात हप्ता जमा..!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे, ज्या महिलांनी 31 जुलै पूर्वी अर्ज केलेला आहे व तो पात्र झालेला आहे, अशा महिलांना 17 ऑगस्ट दरम्यान पहिला आणि दुसरा हप्ता तीन हजार रुपये जमा केला जाणार आहे. तरी ही महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.
तसेच ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता या महिन्यात मिळणार नाही अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात सोबतच ३ हप्त्याचे 4 हजार 500 रुपये दिले जाणार आहे, त्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त करू नये, आता सध्या नवीन महिलांना अर्ज भरण्यासाठी ॲप व पोर्टल ही बंद करण्यात आलेले आहे, फक्त एडिट करता येत आहेत. राज्यात या योजनेसाठी 1.50 कोटीहून अधिक महिलांनी अर्ज केलेले आहेत,
पात्र महिलांना आता लवकरच 17 ते 19 ऑगस्ट दरम्यान रक्षाबंधन साठी तीन हजार रुपये खात्यात वितरित केले जाणार आहे, तरी महिलांनी आपल्या खात्याला आधार लिंक आहे का तपासून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला समस्या आढळणार नाहीत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली युट्युब व्हिडिओ नक्की पहा.. 👇🏻