लाडकी बहीण योजना तुम्हाला ३ हजार मिळाले नसेल तर आत्ताच हे काम करा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले होते व त्या महिलांचे अर्ज अप्रोल झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यावर कालपासून 3000 हजार रुपये डीबीटी द्वारे वितरित केले जात आहे, आतापर्यंत राज्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत, आणि तसेच अजूनही बऱ्याच महिला या योजनेपासून वंचित आहे.
ज्या महिलांना या योजनेचा काल पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नाही अशा महिलांना या तीन हजार रुपयाची प्रतीक्षा लागलेली आहे, ज्या महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत पैसे मिळाले नाही तर त्या महिलांनी आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्यावे, जेणेकरून तुम्हाला एक-दोन दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर पैसे जमा केले जातील,
तसेच ज्या महिलांनी अजूनही या योजनेसाठी अर्ज केलेले नाहीत अशा महिलांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत अर्जाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, तसेच ज्या महिलांनी आता दोन ते तीन दिवसात अर्ज केलेले आहेत, किंवा 31 ऑगस्ट दरम्यानच्या आत करण्यात येणार आहेत अशा महिलांना सप्टेंबर मध्ये सोबतच 4500 रुपये मिळणार आहे.