रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा हा गुढीपाडव्याला मिळणार नाही.
नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमच आमच्या वेबसाईटवर अभिनंदन शेतकरी बांधवांनो राज्य शासना तर्फे जो आनंदाचा शिधा आहे हा सना-वाराला दिला जात असतो. परंतु या सणाला आनंदाचा सिधा मिळणार नाही. मित्रांनो हा शिधा का मिळणार नाही. ही आपण सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तरी तुम्ही सविस्तर माहिती बघण्याचा खालील प्रमाणे प्रयत्न करा.
रेशनकार्ड धारकांनो यंदाच्या गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा वाटण्यास निर्णय घेतला होता, हा निर्णय 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने घेतला होता. राज्यातील 1 कोटी 69 लाख शिधा पत्रिका धारकांना 1 किलो रवा, साखर, चनाडाळ, 1 लिटर सोयाबीन तेल, या वस्तू देण्यात येतील असा महत्वपूर्ण निर्णय घेतला होता.
परंतु बांधवांनो सध्या देशात आचारसंहिता लागू झाल्या कारणाने पुढील येणारे दोन महिने ही योजना बंद राहील अशी माहिती समोर येते. 7 जून 2024 पर्यंत शासनाकडून वाटप न करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारणामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तसेच गुढीपाडवा या निमित्ताने आनंदाचा शिधा मिळणार नाही. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद..