रामचंद्र साबळे 26 ते 28 जुलै दरम्यान या जिल्ह्यांना मुसळधारेचा इशारा..!
नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील 10 ते 15 दिवसापासून अनेक भागात मान्सून ने जोरदार हजेरी लावलेली आहे, आणि काही भागात मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पडत आहे, अजूनही अनेक शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. तर चला पाहूया रामचंद्र साबळे यांनी दिलेला नवीन अंदाज..
या भागात पुढील दोन दिवस, गडचिरोली, गोंदिया, धुळे, जळगाव, हिंगोली, जालना, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, नगर,अकोला,अमरावती, बीड,संभाजीनगर,या जिल्ह्यात पुढील दोन दिवस म्हणजे 28 जुलै पर्यंत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.
तसेच 26 ते 28 जुलै दरम्यान पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, तसेच राहिलेल्या उर्वरित भागात काही ठिकाणी जोरदार पडेल तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा ही पडेल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील युट्युब व्हिडिओ नक्की पहा.👇🏻